श्री देव गांगोचाळा मंदिर
All places
Temples & Spiritual Emerging

श्री देव गांगोचाळा मंदिर

श्री देव गांगोचाळा मंदिर

लोरे नं. २, Taluka Vaibhavwadi — Sindhudurg SND-VAI-0014

जाने -मे
मोफत
अर्धा तास
58 km

About this place

७२ चाळ्यांचा अधिपती: स्थानिक लोकश्रद्धेनुसार, श्री देव गांगोचाळा हे कोकणातील ७२ चाळ्यांचे अधिपती (प्रमुख दैवत) मानले जातात.नवसाला पावणारे देवस्थान: हे कडक आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषतः ज्या दांपत्यांना अपत्यप्राप्ती होत नाही, ते येथे येऊन मनोभावे नवस बोलतात. भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी येथील लोकांची दृढ श्रद्धा आहे.लोऱ्याची जत्रा (उत्सव): लोरे नं. २ गावातील ही जत्रा परिसरातील अत्यंत प्रसिद्ध उत्सवांपैकी एक आहे, जिथे दर्शनासाठी आणि उत्सवाचा आनंद घेण्यासाठी हजारो भाविक एकत्र येतात.मंदिराचे नूतनीकरण: नुकतेच गावकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या लोकवर्गणीतून मंदिराचे सुंदर सुशोभीकरण करण्यात आले असून, मंदिराला एक अतिशय देखणा आणि नवा लुक मिळाला आहे

A glimpse — 15 seconds

Photographs

Getting there

हे ठिकाण वैभववाडी शहरापासून अंदाजे 15 किलोमीटर व कणकवली शहरापासून अंदाजे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या फोंडाघाट (फोंडा डेपो) जवळ आहे.फोंडा डेपोपासून अंदाजे ५ किलोमीटर अंतरावर 'सतीचा माळ' हा थांबा (स्टॉप) येतो. फोंडा डेपोतून सतीचा माळसाठी शेअर रिक्षा (भाडे अंदाजे ₹३० प्रति सीट) सहज मिळतात.सतीचा माळ थांब्यावरून पुढे १० ते २० मिनिटांच्या अंतरावर निसर्गरम्य जंगलाच्या आणि डोंगराच्या कुशीत हे सुंदर मंदिर वसलेले आहे.
गांगो मंदिर, लोरे नं. २, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र - ४१६६०१
फोंडाघाट
वैभववाडी

What you can do

फोटोग्राफीधार्मिक दर्शन

Facilities available

पार्किंगमोबाईल नेटवर्क

Visitor ratings

No reviews yet — share your experience below.

Rate this place

Reviews appear after verification.

Something to correct?